वागदे येथील गोपुरी आश्रमात ३८व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्यप्रभा काव्यसंमेलन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । सिंधुदुर्ग/कणकवली । अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रमात नुकतेच काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवियत्री प्रा.सरिता पवार उपस्थित होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र मुंबरकर,जेष्ठ अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी,तळेरे काॅलेजचे प्रा.विनायक टाकळे हे उपस्थित होते.

यावेळी सर्व प्रथम आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर सर्व मान्यवरांना साद टीमचे श्रेयद शिंदे आणि सहका-यांनी गुलाबपुष्पदेऊन स्वागत केले.याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी सर्व कवींना मार्गदर्शन केले.तसेच सर्व कवींनी आपल्या स्वरचित कविता वाचुन दाखविल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या कवियत्री सरिता पवार यांनी सर्व उदयोन्मुख कवींना समर्पक असे मोलाचे मार्गदर्शन करुन कानमंत्रही दीले. उपस्थित सर्व कवींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा गावकर यांनी खुमासदार पध्दतीने केले.आभार प्रदर्शन श्रध्दा पाटकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रेयस शिंदे,सहदेव पाटककर,सुजय जाधव,अभय मोडक,प्रियांका मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!