दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिनगर नागपंचमी उत्सव मंडळ फलटण आणि योध्दा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांकरीता पारंपरिक नागपंचमी उत्सव ‘जल्लोष’ चे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० वाजेदरम्यान शनिमंदिर, शनिनगर, फलटण येथे आयोजित केला आहे.
या ‘जल्लोष’ कार्यक्रमासाठी श्रीमंत सौ. वैदेहीराजे रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. प्रियालक्ष्मीराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटणच्या माजी नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे प्रतापसिंहराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलाराजे सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.