नागपंचमी सणानिमित्त शिकारीस प्रतिबंध : वनक्षेत्रपाल यांचे फलटण तालुक्यातील सर्व पोलीस पाटीलांना कडक आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२२ । फलटण । एका बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना वन्य प्राणी व पक्ष्यांची होणारी संभाव्य शिकार विचारात घेऊन नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रपाल (प्रा) फलटण यांनी एक पत्र काढून नागपंचमी सणानिमित्त शिकार करण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसा आदेश त्यांनी ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या फलटण तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना दिलेला आहे.

वास्तविक पाहता नागपंचमी या सणाच्या दिवशी शिकार करण्याची पूर्वीची प्रथा असल्याने अनेक वन्यप्राणी पक्षांची शिकार होत असते.त्यामुळे भारतीय साधन संपत्तीचे व वन्यजीवांचे रक्षण करणे भारतीय राज्यघटनेचे कलम 51अ अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. तसेच वन्य जीवांची शिकार करणे, हाताळणे, इजा पोहोचवणे, पाठलाग करणे, फास लावणे, नैसर्गिक अधिवास नष्ट करणे इत्यादी गोष्टी केल्यास भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये सात वर्षे कैद व 25 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये वन्य प्राण्याचे शिकार होणार नाही याची व तसे झाल्यास किंवा दिसून आल्यास खालील दूरध्वनीवर तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी या पत्रात केले आहे. तसे कोणी केल्यास तत्काळ खालील मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संपर्कासाठी पुढील नंबर दिले आहेत.

सचिन रघतवान वनक्षेत्रपाल(प्रा) फलटण – ९४०५५८०४७७,

राजेंद्र कुंभार – वनपाल फलटण – ८००७६६१८२८,

राजेंद्र आवरे- वनपाल आदर्की – ९४२३४९४८६६

वरील क्रमांकावर संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!