
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर येथे भेट देवून मुंबादेवीचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला. माजी आमदार राज पुरोहित, प्रेम शंकर पांडे, हेमंत जाधव व विश्वस्त यावेळी उपस्थित होते.