७९ व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपालांना शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १७: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महापौर किशोरी पेडणेकर, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनीदेखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, नारायण राणे, अरविंद सावंत यांनीदेखील राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!