
पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. दरम्यान, कोलकाता येथे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2021 दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असा दावा केला की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या जागा 221 पेक्षा कमी नसतील. आपल्या विजयाचा मला पूर्ण विश्वास आहे असे त्या म्हणाल्या. आम्हाला दोन वेळा ज्या जागा मिळाल्या आहेत, यावेळी आम्हाला नक्कीच त्यापेक्षा जास्त जागा मिळतील. आमचा यावर 110% आत्मविश्वास आहे.
भाजप जातीचे राजकारण करत आहे: बॅनर्जी
त्या म्हणाल्या की पश्चिम बंगालमध्ये जातीचे राजकारण कधीच घडलेले नाही, परंतु आता भाजपाने याची सुरूवात केली आहे. भाजपाचे लोक प्रत्येक धर्म एकत्र ठेवत नाहीत, तर वाटण्याचे काम करतात. त्या म्हणाल्या की, भाजपच्या लोकांनी बंगालींचीही विभागणी केली आहे, त्यांनी बंगाल्यांचेही बंगालींसोबत भांडण लावले आहे.
त्या म्हणाल्या की, ‘ते म्हणतात की तुम्ही बांगलादेशातील बंगाली आहात आणि तुम्ही येथील बंगाली आहात. गुंडगिरीचे राजकारण कसे करावे हे भाजपालाच माहिती आहे. आयकर आणि सीबीआयच्या माध्यमातून ते राज्य सरकारांना धमकावण्याचे काम करतात. ‘
बंगालमध्ये येण्याचा शाह यांचा हक्क: ममता
गृहमंत्र्यांच्या बंगाल दौर्यावर त्या म्हणाल्या की, त्यांचा हक्क आहे, ते येऊ शकतात आणि बोलू शकतात. मी लक्ष्मण रेषेचे पालन केले. पण त्यांनी काय केले? ते येथे येऊन आम्हाला धमकावत आहेत. आम्हाला उद्धवस्त करतील असे ते म्हणतात. आम्हाला पाहून घेतली. त्या म्हणाल्या की, आम्ही कुणाला घाबरणार नाही.
शाह यांना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचे आव्हान केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही ममता यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की दोन लोक देश चालवत आहेत. सर्वांना म्हणतात की, आम्ही जे बोलू, तेच चालेल. ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवली गेली तर ते पराभूत होतील, हे भाजपला माहित आहे. त्यामुळे ते जात आणि धर्माचे राजकारण करत आहेत.
TMC-BJP मध्ये थेट लढत
तृणमूल काँग्रेस सलग दुसऱ्यांदा बंगालच्या सत्तेवर आहेत. 2011 मध्ये तृणमूलने 184 जागा जिंकल्या होत्या. तर 2016 मध्ये त्यांच्या खात्यात 211 जागा होत्या. यावेळी ममता सरकारची लढाई भाजपशी आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजप विधानसभेतही विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.