दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील राजाळे येथील श्री जानाईदेवीचे यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर देवस्थाने ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेली आहे.
दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये श्री जानाईदेवीची पालखी रिंगवणेस हळदी कार्यक्रमासाठी मंदिरातून जाते व हळदी कार्यक्रम झाल्यानंतर परत येते. दि. २३ एप्रिल रोजी पालखी छबिना पहाटे ३ वाजता निघून संपूर्ण गाव प्रदिक्षणा करून सकाळी ८ वाजता मंदिरामध्ये पुन्हा येते.