दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्री रोग तज्ञ डॉ. रखमाबाई राऊत यांच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणा देणारी पुस्तिका लिहुन त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम नागपूर येथील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्या माधुरी वसंत शोभा यांनी केले आहे असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रसेनजित गायकवाड यांनी केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत माधुरी वसंत शोभा लिखित डॉ. रखमाबाई राऊत या विद्रोही सांस्कृतिक चळवळीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची् प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रसेंजित गायकवाड बोलत होते.
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ धनाजी गुरव , मुख्य प्रवक्ते कॉ अविनाश कदम , शिवराम सुखी , सरचिटणीस कॉ डॉ जालिंदर घीगे , उपाध्यक्ष विजय मांडके , सचिव गौतम कांबळे व इतर कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. रखमाबाई राऊत यांच्याबद्दल मुळातच खूप माहिती खूप कमी माहिती आहे हिंदू धर्म शास्त्र विवाहाच्या विरोधात असलेल्या प्रसिद्ध खटल्याच्या संदर्भाने फक्त डॉक्टर रखमाबाई यांना ओळखले जाते परंतु त्याही पलीकडे जाऊन रमाबाईंनी बालविवाह झाल्यामुळे केलेला संघर्ष वैद्यकीय सेवा करताना केलेला संघर्ष अशा संघर्षमय जीवनाची प्रेरणादायी माहिती देणारे हे पुस्तक आहे असे यावेळी शिवराम सुखी यांनी सांगितले.
यावेळी प्रा गौतम काटकर ,दिग्विजय पाटील स्वप्नील धांडे , दत्ताभाऊ पाटील ,शिवराम ठवरे, रंजना आठवले , अनुप्रिया कदम , रश्मी लोटेकर , नम्रता पिंपळे आदी उपस्थित होते.