स्थैर्य, फलटण, दि. ९ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शेरेचीवाडी (ढ) या ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचारी व ग्रामप्रशासनातील प्रभावीपणे कार्य करणाऱ्या महिला अधिकारी यांचा विशेष सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आले.
ग्रामसेविका श्रीमती मोनिका मुळीक, अंगणवाडी सेविका लक्ष्मी चव्हाण, आशा सेविका योगिता घाडगे, मदतनीस सुवर्णा मोहिते, डेटा एंट्री ऑपरेटर गीता नलवडे या सर्वांनी उत्कृष्ट कार्यालयीन कामकाजासोबतच कोरोना महामारीच्या नियंत्रण व उपाय योजनेसाठी अत्यंत प्रभावीपणे शेरेचीवाडी गावासाठी कार्य केलेले आहे. तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघमारे, शिक्षिका श्रीमती सोनावणे व सेविका कल्पना ढवळे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गावच्या सरपंच सौ. दुर्गादेवी नलवडे, ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, शितल फडतरे, अभिजीत मोहिते व महेश बिचुकले यांचे शुभहस्ते सत्कार संपन्न करण्यात आला.
यांच्यासोबत शहीद जवान नवनाथ ढेंबरे यांच्या मातोश्री वीरमाता कमल ढेंबरे यांनाही आदर्श माता म्हणून गौरविण्यात आले. उपस्थितांचे स्वागत शिक्षक अजित चव्हाण व प्रास्ताविक बँक व्यवस्थापक प्रकाश नलवडे यांनी केले. शेतकी अधिकारी हनुमंतराव चव्हाण यांनी विशेष मार्गदर्शन केले तर भाऊसाहेब मोहिते यांनी आभार मानले.
यावेळी फलटण दूध संघाचे संचालक श्रीरंग चव्हाण, पी. एस.आय. दत्तात्रय मोहिते, आरोग्य सेवक अरुण चव्हाण, माजी उपसरपंच दिनकर चव्हाण, उद्योजक बाळासो पवार, सोमनाथ डांगे, अमर चव्हाण, शिवाजी फडतरे, महेश चव्हाण, संदीप पवार, सचिन शिंदे, सोपान नलवडे, शिवाजी ढेंबरे, सचिन मोहिते, लिपीक संतोष मोहिते आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल विविध स्तरांतून कौतूक होत आहे.