निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण देवकाते यांना निरोप


दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२३ | फलटण |
निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने पशूसंवर्धन विभागाचे डॉक्टर किरण देवकाते यांचा निरोप समारंभ शनिवारी निरगुडी ग्रामपंचायत येथे पशूसंवर्धन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निरगुडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कोमल सचिन सस्ते, ग्रामपंचायत सदस्य शाहूराज सस्ते आणि निरगुडी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी डॉ. देवकाते यांनी पशूसंवर्धनाबाबतीत योग्य ते मार्गदर्शन निरगुडी ग्रामस्थांना केले व जंतावरील गोळ्या आणि औषधांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी निरगुडी गावचे युवा नेते सचिन सस्ते यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. किरण देवकाते यांच्यासारखी प्रामाणिक माणसं शासनाला मिळाली, हे शासनाचे भाग्यच. लम्पीसारखा आजार असताना फलटण तालुक्यात प्रथमच गिरवी विभागात स्वतः लक्ष घालून आणि त्यांच्या पूर्ण टीमने लसीकरण पूर्ण केले. गिरवी विभागामध्ये लम्पीच्या आजारामुळे फक्त बारा जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये निरगुडीमध्ये एकही जनावर लम्पी आजारामुळे मृत्यूमुखी पडलेले नाही. त्याचे सर्व श्रेय डॉ. देवकाते व त्यांच्या टीमला जात आहे.

डॉक्टरांच्या निरोप समारंभावेळी निरगुडी गावचे शेतकरी भावुक झाले होते. असा डॉक्टर मिळणे, हे गिरवी भागाचे भाग्यच होते. त्यांचा सत्कार निरगुडी गावचे वारकरी संप्रदायातील आनंदराव शिंदे (आप्पा) यांच्या हस्ते करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!