क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने ब्राम्हण गल्लीत वारकर्यींच्या सेवेसाठी औषधे प्रदान


दैनिक स्थैर्य । दि. २८ जुन २०२२ । फलटण । येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील ब्राह्मण गल्लीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांच्या सेवेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) यांच्या फलटण केंद्राला औषधे मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत. सदरील औषधे ही क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून नुकतीच अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांच्या फलटण केंद्राला देण्यात आली.

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संचालक सुनील नेवसे, कु. वैष्णवी नेवसे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्राचे केंद्र प्रमुख भालचंद्र ताथवडकर, उपकेंद्र प्रमुख नंदकुमार केसकर, कार्याध्यक्ष वैभव विष्णुप्रद, सचिव अनिरूध्द, जेष्ठ कार्यकारणी सदस्य दत्तात्रय चरेगावकर, सचिन कुलकर्णी व कोषाध्यक्ष वामनराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!