दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | फलटण |
क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने लोकमान्य मेडिकल फाउंडेशन व सूर्या एचपी गॅस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकर्यांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबिर दि. ९ जुलै रोजी संपन्न झाले.
यावेळी निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, अध्यक्ष फलटण मेडिकल असोसिएशन डॉ. रविंद्र बिचुकले ह.भ.प. जाधव महाराज (अध्यक्ष, फलटण तालुका वारकरी संघटना), डॉ. संजय राऊत (संस्थापक अध्यक्ष, फलटण डॉक्टर्स असोसिएशन), डॉ. सचिन गोसावी (माजी अध्यक्ष, फलटण डॉक्टर्स असोसिएशन), दादासो चोरमले (आस्था टाइम्स), दशरथ फुले (सामाजिक कार्यकर्ते), नरेंद्र (राजाभाऊ) भोईटे (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे औषधोपचार शिबिर लोकमान्य नर्सिंग होम, लक्ष्मीनगर, फलटण येथे घेण्यात आले.
या शिबिरासाठी डॉ. बी. के. यादव, डॉ. सुरेखा यादव, डॉ. चंद्रशेखर यादव, डॉ. क्रांती यादव जांभुळकर, डॉ. इंद्रजीत यादव, डॉ. अमित मोरे, डॉ. पूर्वा यादव, श्री. अमोल जगताप (मॅनेजर, मुर्दा एच. पी. गॅस एजन्सी) यांनी परिश्रम घेतले.