ठाण्यातील १९७ संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । ठाणे । ठाणे नगरीतील विविध क्षेत्रातील १९७ संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांची प्रकट मुलाखत झाली.ठाण्यातील विविध संस्थांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री जनगौरव सोहळा समिती गठित केली. या समितीच्या वतीने आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी राज्याचे मंत्री उदय सामंत, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, गौरव समितीचे अध्यक्ष विलास ठुसे, कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे, पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे यांचे आनंद विश्व गुरुकुल आश्रमाच्या शिक्षकांनी औक्षण केले. विविध झाडांच्या बियापासून बनविलेला हार घालून मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्याचे प्रकाशन, उठाव गौरव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी झाले. ठाणे महानगरपालिकेच्या कर संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या भारत बिल पेमेंट सिस्टीम या ऑनलाईन प्रणालीचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलखुलास उत्तरे दिली.


Back to top button
Don`t copy text!