मित्रानेच केली ओमनी कारची चोरी; फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. १३ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथे पंढरपूर रस्त्यालगत पुजारी कॉलनीमध्ये असलेल्या ‘शिवभोजन’ या शासकीय मेससमोरून सिल्वर रंगाची मारुती ओमनी गाडी (क्र. एमएच १४ बीआर ३६६६) अंदाजे किंमत ६०,००० हजार रुपये ही फिर्यादीचा मित्र बापू आडके (रा. काशिदवाडी, ता. फलटण) याने चोरून नेल्याची फिर्याद महेंद्र रामचंद्र पवार (वय ५४, रा. पवार गल्ली, कसबा पेठ, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

ही घटना दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरीचा अधिक तपास स.पो.फौ. संतोष कदम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!