दैनिक स्थैर्य | दि. 14 जानेवारी 2024 | फलटण | आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालयाने आर्किटेक चि.ओंकार कृष्णाथ चोरमले यास
“NICMAR” युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आर्किटेक्ट अनिल कश्यप यांच्या शुभहस्ते व एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत “प्रेरणा चषक” देऊन सन्मानित करण्यात आले.
चि.ओंकार चोरमले हा एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन निगडी पिंपरी चिंचवड या महाविद्यालयाचा २०१५ ते २०२० या बॅचचा विद्यार्थी असून त्याने आर्किटेक ही पदवी डिस्टिंक्शनने पास केली असून तो आपल्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस उल्लेखनीय काम करीत असल्यामुळे त्याच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
खंर तर एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालया मधून प्रतिवर्षी डिग्री घेऊन जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
आर्किटेक ओंकार चोरमले हा “आस्था टाईम्सचे” कार्यकारी संपादक तथा “श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे” मुख्याध्यापक दादासाहेब चोरमले व फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली चोरमले यांचे चिरंजीव आहेत.
आर्किटेक ओंकार चोरमले यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य विक्रीकर विभागाचे अतिरिक्त सचिव हर्षकुमार निकम, महाराष्ट्र राज्य दारूबंदी व उत्पादन शुल्कचे संचालक सुनील चव्हाण, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष निताताई नेवसे, फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष रणधीर भोईटे, बिल्डर असोसिएशनचे संस्थापक प्रमोद अण्णा निंबाळकर, विक्रम शेठ झांझुरणे, बिल्डर जावेद भाई तांबोळी इत्यादी सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.