ओंकार चव्हाण यांनी स्वखर्चातुन साडी, फेसशिल्ड व मास्क यांचे वितरण केले


स्थैर्य, फलटण, दि. 24 : कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीत लोकांच्या आरोग्याची काळजी घेणार्या अंगणवाडी सेविकांना त्यांच्या स्वताच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणुन ओंकार चव्हाण यांच्या स्वखर्चातुन साडी, फेसशिल्ड व मास्क यांचे वितरण करण्यात आले.

अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचे काम कौतुकास्पद असुन त्या आपल्या आरोग्याची काळजी  घेत आहेत त्यांच्या विषयीची कृतज्ञता सन्मान करुन व्यक्त केली. -ओंकार चव्हाण

त्यावेळी श्री सत्यवान चव्हाण, श्री आर. जी. चव्हाण, श्री बाळासाहेब देशमुख, श्री आनंदराव चव्हाण, श्री गणेश चव्हाण, वैभव कणसे, जय चव्हाण यांची उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!