सातारा शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण; पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । संपूर्ण जगाची झोप उडविणाऱ्या ओमायक्रॉन चा पहिला रुग्ण सातारा शहरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . सातारा पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संबधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत सहा रुग्ण आढळून आले असून ते फलटण तालुक्यातील आहेत . आरोग्य यंत्रणेच्या हवाल्या नुसार या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे . सातारा शहरात वास्तव्य करणाऱ्या एका युवतीला ओमायक्रॉन ची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले . हा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला आज प्राप्त झाला . आरोग्य यंत्रणेच्या हवाल्यानुसार ही युवती आठ दिवसापूर्वी अमेरिकेवरून साताऱ्यात पोहोचली . या युवतीच्या घशाचे स्त्राव दिनांक 23 तारखेला घेण्यात आले होते . मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे . कस्तुरबा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने या युवतीसह तिच्या संपर्कातील असणाऱ्यांची माहिती घेऊन तत्काळ तपासणी सत्र सुरु केले आहे . मात्र सदर युवतीची प्रकृती स्थिर अपल्याची माहिती कोविक्ष कक्ष संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे .


Back to top button
Don`t copy text!