ओम सावळे-पाटील ‘गोदरेज ट्री एथलॉन’चा मानकरी

राज्यातील स्पर्धकांचा सहभाग व पर्यावरणाचा प्रसार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
बारामती एमआयडीसी येथे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने आज भारत फोर्ज ते सह्याद्री काऊ फार्म पर्यंत (१५ किमी) गोदरेज ऍग्रोवेट लि. आयोजित ‘गोदरेज समृद्धी ट्री एथलॉन २०२३’च्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष खुल्या गटात बारामती सायकल क्लबचा खेळाडू ओम सावळे-पाटील याने १५ किलोमीटरचे अंतर ५९ मिनिट व ११ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला, तर दुसरा क्रमांक युवराज भोसले व तिसरा क्रमांक दादासो सत्रे यांनी मिळवला.

याप्रसंगी कंपनीचे अधिकारी एस. वरदराज, विवेक रायझदा, दीपक कोळेकर, अभिमन्यू ढोले, ज्योतिराम चव्हाण, देवेंद्र राऊत, संपत सुंदर, ओंकार पोटे, संदीप मोरे, आबासाहेब भोईटे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक केसरकर, अग्निशमन अधिकारी महेश इंगवले व इतर मान्यवर उपस्थित होते.

१५ किलोमीटर महिलांमध्ये प्रथम काजल गावडे, दीपाली जगताप, डॉ. नंदिता देवकाते व ५ किलोमीटर पुरूषमध्ये चंदन कुमार, अजित कुमार, सुजित कुमार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा तर ५ किलोमीटर महिला आरती कदम, मनीषा शिंदे व सोनाली ठवरे या विजेत्या ठरल्या.

पुरूष कर्मचारी १५ किमीमध्ये तुषार धोंडे, विबिशन पवार, पांडुरंग पवार तर ५ किमी पुरुष कर्मचारी समाधान कातुरे, रोहन चांदगुडे व सूरज वाघ तर महिला कर्मचारी ५ किमीमध्ये अक्षदा शेंडगे, श्रद्धा कोडकर व प्रियांका खामगळ या विजेत्या ठरल्या. प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

प्रत्येक खेळाडूने घरासमोर, शेतात, अपार्टमेंटमध्ये वृक्षारोपण करावे म्हणून रोपटे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व पुढील वर्षी मोठे झालेल्या त्याच रोपट्याबरोबर सेल्फी घेऊन येणार्‍यास मॅरेथॉनमध्ये मोफत नोंदणी केली जाणार असल्याचे गोदरेज ऍग्रोवेटच्या वतीने जोतिराम चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील आठशे स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. संदीप मोरे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!