दैनिक स्थैर्य | दि. १५ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील विमानतळ येथील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरून दि. ९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामधून फिर्यादी यांचे वडील नारायण लक्ष्मण पोपळघट (वय ७०, रा. कहाकर बु॥, ता. शेनगाव, जि. हिंगोली) हे बाथरूमला जातो असे म्हणून निघून गेले आहेत, ते परत आले नाहीत, अशी तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात रेणुका शिवाजी काळे (रा. कहाकर बु. ता. शेनगाव, जि. हिंगोली) यांनी दिली आहे.
नारायण पोपळघट हे उंची ५ फूट ५ इंच, रंगाने गोरे, अंगाने सडपातळ, नाक सरळ, डोळे काळे, केस पांढरे, अंगात पांढर्या रंगाचा शर्ट व धोतर, टोपी पांढर्या रंगाची, पायात काळ्या रंगाचे बूट, मराठी भाषा बोलतात, असे त्यांचे वर्णन आहे.
अधिक तपास म.पो.हवा. फाळके करत आहेत.