दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सुरवडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीतील रॉयल गार्डन पॅलेस समोरील मारुती मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जात असताना शुक्रवारी पहाटे ५.३० ते ६.०० वाजण्याच्या सुमारास फलटणहून लोणंदकडे जाणार्या वाहनावरील (क्रमांक एमएच-११-डीडी-०४८३) चालक निखिल उमेश वेताळ (रा. निंबोरे, ता .फलटण) यांनी धडक दिल्याने महादेव विठ्ठल साळुंखे (वय ७८, रा. सुरवडी, ता. फलटण) हे डिव्हायडरजवळ पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी चालक निखिल उमेश वेताळ (रा. निंभोरे, ता. फलटण) याच्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि शिंदे करत आहेत.