माजी नगरसेवकांच्यासह अधिकार्यांनी जनतेची दिशाभूल करू नये : राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची सुमारे पसतीस लाखांची विजबिलाची थकबाकी होती. त्याबाबत २६ नोव्हेंबर रोजी महावितरणने नगरपालिकेस नोटीस सुध्दा बजावली होती. याची जाणीव सत्ताधारी गटातील माजी नगरसेवकांच्यासह अधिकार्यांनी सुध्दा ठेवावी. जनेतची दिशाभूल करण्याचे काम करू नये, असे आवाहन फलटण राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज पवार यांनी केलेले आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी बनवाबनवी करून फलटणच्या जनतेची दिशाभूल करू नये. प्रशासक म्हणून कार्यभार करत असताना खोटानाटा कारभार चालणार नाही. त्याऐवजी शासनाने प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे प्रशासकाचा कार्यभार सुपुर्त करावा, असेही शहराध्यक्ष पंकज पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!