भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य , मुंबई , दि .२८: राज्यातील प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपच्या अधिकृत वेबासाईटवरील एक गंभीर चूक सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरली होती. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा असभ्य भाषेत चुकीचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली होती. या वादग्रस्त शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले होते. या प्रकरणावर थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया देत कारवाईचा ईशारा दिला होता. यानंतर अवघ्या काही तासांत भाजपने ही चूक सुधारली आहे.

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती देण्यात येते. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख करण्यात आलेला असतो. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असे लिहिण्यात आले होते. याचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला चूक सुधारण्यास सांगितले होते.

अनिल देशमुख सोशल मीडियावर म्हणाले होते की, ‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहिल्यानंतर मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजप आपण दोषी व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा पुढील कारवाई महाराष्ट्र सायबर सेल करेल’ असा इशाराच गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिला होता. यानंतर 12 तासांमध्येच भाजपने ही चूक सुधारली आहे.


Back to top button
Don`t copy text!