प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्याने एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । सातारा । प्रतिबंधित अन्नपदार्थाचा विक्रीसाठी साठा करून ठेवल्याने सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ सप्टेंबर रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास सिद्धनाथ वाडी येथील साई किराणा स्टोअर्समध्ये प्रतिबंधित असलेले अन्नपदार्थांचा विक्रीसाठी साठा केल्याने दुकानाचे चालक सुरज मनोहर गायकवाड यांच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठलराव रुपनवर यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरज गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!