
दैनिक स्थैर्य | दि. 22 जुलै 2025 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेची व फलटण पंचायत समितीची प्रारूप गट व गण रचना काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेली होती. प्रकाशित केलेल्या गट व गण रचनांवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 21 जुलै होती 21 जुलै अखेर फलटण तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट व 5 पंचायत समिती गणांसाठी हरकती सूचना दाखल करण्यात आले असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.
याबाबत पुढील सुनावणी ही विभागीय आयुक्त यांच्यासमोर होणार असून दि. 28 जुलै पासून हरकती सूचनांच्या वर सुनावणी संपन्न होणार आहे.
फलटण तालुक्यातील कोळकी, गुणवरे, बरड (2 हरकती) व हिंगणगाव जिल्हा परिषद गटांसाठी हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
कोळकी, जाधववाडी, गुणवरे, बरड व हिंगणगाव या पंचायत समिती गणांसाठी हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी हरकती ह्या तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत.

