स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३१: ‘ओबीसीं’साठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता सैनिकी शाळांमध्येही ओबीसी मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. सैनिक शाळांमध्ये सध्या 15 टक्के जागा शेड्युल्ड कास्टसाठी 7.5 टक्के, शेड्युल्ड ट्राईब २, लष्करातल्या आजी माजी कर्मचा-यांसाठी 25 टक्के, तर राहिलेल्या जागांमध्ये ओपन कॅटेगिरीतल्या मुलांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकराखाली देशात 33 सैनिक शाळा चालवल्या जातात. या संबंधीचे आदेश 13 ऑक्टोबरला काढण्यात आले असून ते सर्व शाळांच्या प्राचार्यांकडे पाठविण्यात आल्याची माहितीही अजय कुमार यांनी ट्विटरवर दिली आहे.
शाळांमधल्या 67 टक्के जागा या ज्या ठिकाणी ती शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्र शासित मुलांसाठी असतात तर 33 टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात.
या निर्णयामुळे देशभरातल्या मुलांना फायदा होणार आहे. महाराष्ट्रात मराठ आरक्षणावरून अजुनही पेच सुटलेला नाही. ओबीसींच्या आरणक्षाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टात असून मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग होणार आहे.