
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने करणारे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी नुकतीच शिवसेना शिंदे गटाचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या मिरगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी तुकाराम सरक यांनी प्रा. लक्ष्मण हाके यांचा चळवळीतील योगदानाबद्दल सत्कार केला. या भेटीदरम्यान ओबीसी आरक्षण आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. तुकाराम सरक यांनी प्रा. हाके यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पडर, युवा नेते पिंटू खताळ आणि नितीन गोफणे हे देखील उपस्थित होते.