स्थैर्य, दि.२: शेती व्यवसाय हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. हे पुन्हा कोरोना सारख्या महामारीच्या काळात सिद्ध झाले… सगळा देश लॉकडाऊन होता… रस्ते थांबले होते… सगळी चाकं जाम होती, पण शेत आणि शेतकरी पोशिंद्याच्या भूमिकेत होता. महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्याने या कोरोना काळात उत्तम नियोजन करुन प्रत्येकाच्या घरात भाजी जाईल हे पाहिले. त्याला सातारा जिल्हाही अपवाद नव्हता.
सातारा जिल्ह्यातील भाजीपाला अगदी मुंबई, पुणे, कोकणातही जातो… लोकांच्या जेवणात हिरवा भाजीपाला देवून शरीराला आवश्यक असलेल्या मिनरलचा पुरवठा होता…. आता तर राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत शेतकरी आणि ग्राहक एकत्र आले आहेत. 26 जानेवारी रोजी साताऱ्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहविणाऱ्या शेतकऱ्याची कथा.
रमेश बळवंत ससाणे भुईंज ता. वाई येथील विविध प्रयोग करणारे शेतकरी त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण 30 एकर शेती आहे. त्यांना नुकतेच शेडनेट उभारणी शासनामार्फत 50 टक्के अनुदान मिळाले आहे. आता त्यांनी या शेडनेटमध्ये ढोबळी मिर्चीची लागवड केलेली असून स्वत:चा माल ते स्वत:च ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. थेट माल ग्राहकांपर्यंत जात असल्याने थेट नफा त्यांना मिळत आहे. त्यांच्या केलेल्या कामाचे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असेच त्यांचे काम आहे.
रमेश बळवंत ससाणे शेतकरी आहेत. भुईंजचे राहणारे आहेत ते. त्यांच 9 वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. या शेडनेटमध्ये ‘पसरेला’ जातीची ढोबळी जातीची मिरचीची लागवड केली. सगळा देश लॉकडाऊन मध्ये असताना संप्टेंबर मध्ये हे उभं केलेलं आहे. याचा खर्च जवळ जवळ 13 लाख रुपये आहे. या शेडनेटसाठी शासनाच्या कृषी विभागाने जवळजवळ 6 लाख रुपयांचं याला अनुदान दिले आहे. यांना यातून जे अपेक्षीत उत्पादन मिळणार आहे ते २० टन अपेक्षीत उत्पन्न असणार आहे. २० टनामधुन जवळजवळ १० लाख रुपये यांना याच्यातून मिळणार आहेत. याच्यातला निव्वळ नफा साडे सात लाख पर्यंत जातो. या ज्या २० गुंठ्यात जे आता शेडनेट सुरु आहे. मिरची सुरु आहे. प्रत्येक ४ दिवसाला ही मिरचीची तोडणी करतात आणि ठाणे येथील मार्केट, मुंबई येथील मार्केट आणि स्थानिक मार्केट उत्पादीत माल विकतात. एवढ्या 20 गुंठ्याची जागा म्हणजे जवळ जवळ ½ एकरच्या क्षेत्रामध्ये ते कोरडवाहु मधल्या 10 एकर जमिनीतपण निघणार नाही एवढा माल ते एकट्या 20 गुंठ्यात करतात. त्यांना कृषी विभागाचं मोठं सहकार्य आहे. वेळोवेळी मागदर्शन त्यांना मिळतं, 4 ते 5 दिवसाला याच्यावर फवारणी होते. असं हे आगळं वेगळं आर्थिक कृषी शास्त्र केल्यामुळे प्रचंड नफ्यामध्ये आहे.याचा जो खर्च झालेला आहे तो खर्च येत्या 1-2 वर्षामध्ये हा खर्च निघून जाईल आणि उरलेला जो नफा आहे तो नफा शेतकरी आर्थिक उन्नत कसा होतो हे दाखवण्यासाठी खुप बोलकं उदाहरण आहे.
रमेश ससाणे यांचं संयुक्त कुटुंब आहे. त्यांच्या घरात एक ॲग्रीकल्चर पदवीधर आहे आणि ॲग्रीकल्चर पदवीधर असल्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. अगदी कुठली जात वापरायची, मातीचा पोत कुठला आहे. या मातीत प्रकारचे पिक येऊ शकतात. हे दुसऱ्या क्रमांकाच शेडनेट आहे. याच्या अगोदरपण यांनी शेडनेट घेतलेलं आहे आणि कृषी विभागाची साथ आहे. आणि रात्रंदिवस फक्त शेती हा यांचा ध्यास आहे. या ध्यासातुन त्यांनी हे सगळं जे आज उभं कलेलं आहे. आणि अक्षरश: सोन या ठिकाहुन ते उगवतात असं एकूण चित्र आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की, जर शेती मन लावून केली शास्त्र शुध्द पध्दतीने केली, मार्केटची डिमांड बघुन जर केली तर शेती ही परवडु शकते हे याचं बोलकं उदाहरण म्हणजे रमेश सासणेंची शेती आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने तंत्राज्ञानाची जोड देवून शेती केली तर निश्चितपणे त्यांना शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळून चांगली आर्थिक उन्नती होवू शकतो रमेश ससाणे हे एक जिल्ह्यातील उदाहरण आहे.
– युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा