आता मिसेस फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा – ज्या लोकांना विश्वास नाही त्यांना प्रमाणपत्र देऊन स्वत: ला सिद्ध करावे लागते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.१४: राज्यात मंदिरे उघडण्यावरुन प्रचंड राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. आता माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अमृता यांनी बुधवारी ट्विट केले की, महाराष्ट्रात बार आणि दारुची दुकाने उघडण्याची सूट आहे, मात्र मंदिर हे धोक्याच्या झोनमध्ये आहेत. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना सर्टिफिकेट देऊन स्वतःला सिद्ध करावे लागते, असे लोक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) लागू करण्यात अपयशी ठरतात.

मंदिर उघडण्यावरुन मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये पत्रांचा ‘सामना’ रंगला होता


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे म्हणत त्यांनी खोचक शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

पत्रात काय म्हणाले होते राज्यपाल?


हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळतेय की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होता, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली? आहे’ असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विचारला होता.

यावर कडाडले उद्धव ठाकरे


‘माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही असे म्हणत त्यांनी राज्यपालांना सुनावले होते.

हिंदुत्वाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. तसेच हिंदुत्वाविषयी तुम्हाला असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपणास वाटते का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा उलट सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!