दैनिक स्थैर्य | दि. ३१ मार्च २०२३ | फलटण |
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलमताई गोर्हे यांनी कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी ना. नीलमताई गोर्हे यांचा यथोचित सन्मान फलटण नगरपरिषदचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह (दादा) नाईक निंबाळकर व सौ. मनिषाताई नाईक निंबाळकर, कुमारी ऐश्वर्या नाईक निंबाळकर व रणवीरराजे नाईक निंबाळकर यांनी केला.
याप्रसंगी गटनेते अशोकराव जाधव, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, सचिन कांबळे पाटील, सागर शहा, नगरसेवक बाळासाहेब कुंभार, नाना सस्ते, शंभूराजे बोबडे, युवराज सस्ते, राहुल शहा, निलेश चिंचकर, सागर लंबाते, संतोष जाधव, सुरज तांदळे, सुमित चोरमले, नितीन वाघ, व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.