सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण नाही; चिकन, अंडी खाणे सुरक्षित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२५ | फलटण |
सातारा जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ या आजाराचे बाधित कुक्कुटपक्षी आढळून आले नाहीत. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग ‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी सतर्क झाला असून पूर्वतयारी करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी दिली आहे.

बर्ड फ्लू आजाराबाबत नागरिकांनी घाबरून न जाता चिकन व अंडी शिजवून खाल्ल्याने कोणताही रोग उद्भवत नाही व शिजवलेले मास व अंड्यामध्ये जिवाणू व विषाणू जिवंत राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी चिकन व अंडी शिजवून त्यांचा वापर करावा.

जिल्ह्यात कोठेही कुक्कुटपक्षी किंवा इतर पक्षांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कोंबड्या किवा इतर पक्षी मरतुक दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!