कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही आंदोलन करणार नाही : मराठा क्रांती मोर्चा; मराठा समाजाची कोणी सोशल मीडियावर बदनामी केल्यास गुन्हा दाखल करणार : पोलिस निरीक्षक किंद्रे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.०७: सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द केल्याने सकल मराठा समाजात उद्रेक निर्माण झाला आहे. या अनुषंगाने राज्यातील विविध ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मात्र फलटण शहर व तालुक्यात कोरोनाची परिस्थिती भयावह असल्याने मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी कोणतेही आंदोलन करू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक बी.के.किंद्रे यांनी सकल मराठा समाजाला केले आहे.

दरम्यान आज दिनांक 6 मे 2021 रोजी 5 वाजता फलटण उपविभागीय पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणे मध्ये सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेल्या मराठा आरक्षण निकालाचे पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा फलटणचे समन्वयक यांचे सोबत बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून शहर व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारे कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.सदर वेळी समन्वय समितीने जिल्हाधिकारी सातारा यांनी जिल्ह्यामध्ये कोविड -19 अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याने त्यांचे उल्लंघन आमच्या हातून होणार नाही व प्रशासनाचे पूर्वपरवानगीशिवाय अचानक कोणतेही आंदोलन मराठा क्रांती मोर्चा, व इतर संघटना करणार नाही असे आश्वासन मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक यांनी दिले आहे.

फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मा.सुप्रीम कोर्टने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाचे अनुषंगाने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा सोशल मीडियाद्वारे कोणीही कमेंट्स अथवा फोटो व्हायरल करणार नाही. असे केल्यास संबंधितांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. असे फलटण शहर पोलिस ठाण्याने सांगितले आहे.

दरम्यान यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सांगितले की, काही लोक मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी व आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंसक आंदोलन केल्यास त्यांचेवर कडक कारवाईला आमचा विरोध राहणार नाही. तसेच सध्या आपल्या फलटण शहर व तालुक्यात कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर झाली असून आत्ता कोणतेही आंदोलन करणार नाही. मात्र राज्य सरकारने व केंद्र सरकारने योग्य तो समन्वय साधून आम्हाला आरक्षण मिळावे अशी भूमिका मांडली असून सध्या मराठा समाज कोणतेही हिंसक अथवा इतर आंदोलन करणार नाही. असे स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!