नितीन खानविलकर यांचे अल्पशा आजाराने निधन


शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे कार्यकर्ते निलेश खानविलकर यांचे बंधू नितीन जयसिंगराव खानविलकर यांचे अल्पशा आजाराने निधन; परिसरात हळहळ.

स्थैर्य, फलटण, दि. १५ फेब्रुवारी : फलटण शहरातील शुक्रवार पेठ परिसरात शोककळा पसरली असून शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे कार्यकर्ते श्री निलेश जयसिंगराव खानविलकर यांचे बंधू नितीन जयसिंगराव खानविलकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच तालीम मंडळाचे कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. शांत, मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांचे चांगले सामाजिक संबंध होते.

खानविलकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगात अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.


Back to top button
Don`t copy text!