दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । देशभरातील शाळांमध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी हरित विदद्यालयाच्या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. यानिमित्त चित्रपट अभिनेते व सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशोदा टेक्नीकल इन्स्टट्यिूट सातारा येथे निशंक राष्ट्रीय महोत्सवाचे शनिवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी निशंक महाराष्ट्रचे अध्यक्ष विक्रम अडसूळ, गव्हर्नर बॉडी मेंबर निशंक भारतचे उपाध्यक्ष सुनील देसाई, सचिव उमेश देशमुख, बाळासाहेब कचरे, सुनलि लोंढे आदी उपस्थित होते.
निशंक राष्ट्रीय महोत्सवाचे हे चौथे वर्षे आहे. यापूर्वी दिल्ली, जम्मू काश्मिर, बिहार आणि आता सातारा येथे होत आहे. पुढील वर्षी केरळ येथे हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये आठ राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या महोत्सवानिमित्त सातारा शहरातील राजवाडा येथून १२ रोजी सकाळी ८ वाजता रॅलीस सुरुवात होवून ती महाराजा सयाजीराव विद्यालय येथून रॅली पर्यावरण जनजागृतीसाठी हरित विद्यालयाच्या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
कला, शिक्षण, संस्कृती या त्रिसुत्रीवर काम करणारी निशंक भारत ही एक राष्ट्रीय स्तरावरची स्वयंसेवी संस्था आहे. सध्या दिल्ली, हरियाणा, जम्मू काश्मिर, बिहार, गुजरात, आंध्रप्रदेश, केरळ, अंदमान आणि निकोबारसह महाराष्ट्रात या संस्थेच्यावतीने कला, शिक्षण संस्कृतीच्या जतनासह पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जाते. यंदा प्लास्टिक बंदीसह हरित विद्यालय (ग्रीन स्कूल) या नाविन्यपूर्ण संकल्पनेची सुरुवात १२ नोव्हेंबरला यशोदा टेक्नीकल इन्स्टट्यिुट वाढे सातारा येथे चौथ्या राष्ट्रीय महोत्सवाला सुरुवात केली जाणार आहे. अध्यक्षस्थानी निशंक भारताच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रा. पवन सुधीर या आहेत. तर उद्घाटक अभिनेते सयाजी शिंदे हे आहेत. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, शिक्षण संचालक महेश पालकर, माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षण अभ्यासक डॉ. प्राची साठे, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्रा. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, यशोदाचे संस्थापक दशरथ सगरे, निशंक भारतचे राष्ट्रीय सचिव राजिंदर खजुरीया, खजिनदार चित्रगुप्त गोस्वामी आदी उपस्थित राहणार आहेत.