दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून ‘शिक्षक दिन’ जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील निवृत्त शिक्षक श्री. विजयकुमार पांडुरंग झांजुर्णे, श्री. वसंत श्रीपती सस्ते, श्री. व्यंकटराव भिवा सस्ते, श्री. दशरथ नामदेव सस्ते, श्री. बाळकृष्ण नामदेव फाळके, श्रीमती रेखा केशव तावरे, मुख्याध्यापक श्री. भिसे गुरुजी, श्री. सुतार सर, श्री. चांगण सर, सौ. कदम मॅडम, सौ. चिंचकर मॅडम, अंगणवाडी शिक्षिका, हायस्कूल शिक्षिका यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन कमिटीमध्ये निमंत्रित सदस्य ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यजित दशरथ सस्ते यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक, ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मुख्याध्यापक भिसे गुरुजी यांनी स्वागत केले. निवृत्त शिक्षक श्री. व्यंकटराव भिवा सस्ते (गुरुजी) यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवन कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला श्री. चंद्रकांत सस्ते, श्री. बाळासो भगवन सस्ते, श्री. संतोष सस्ते, श्री. विठ्ठल सस्ते, श्री. शाहूराज सस्ते, श्री. वामन जाधव, श्री. राजेंद्र लकडे, श्री. धनाजी लकडे, श्री. राहुल सस्ते, श्री. रामचंद्र चव्हाण, श्री. प्रशांत सस्ते, श्री. विकास इथापे, श्री. निलेश गोरे, श्री. महेश सस्ते, श्री. अभिजित सस्ते, श्री. विकास सस्ते, इतर पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना जिलेबी खाऊ वाटप करण्यात आली.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.