अंधश्रद्धा निर्मूलन समिती फलटणच्या वतीने स्वातंत्र्यदिनी मणिपूर घटनेच्या निषेधार्थ ‘निर्भया मॉर्निंग वॉक’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
अंधश्रद्धा निर्मूलन समिती फलटणच्या वतीने स्वातंत्र्यदिनी मणिपूर घटनेच्या निषेधार्थ व व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील सूत्रधारांचा तपास कधी लागणार, यासाठी ‘निर्भया मॉर्निंग वॉक’ काढून व पत्रकाचे वाटप करण्यात आले.

दहा वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना पुण्यात घडली. २० ऑगस्ट २०१३ या दिवसाची सुरूवातच अत्यंत धक्कादायक घटनेनं झाली होती. पुण्यातल्या मध्यवस्तीतल्या, बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्याच बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास होऊन खटला सुरू व्हायला २०२१ साल उजाडावं लागलं.

सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि हा खटला सुरू झाला. सध्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेणं सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल कधी लागेल, हे सांगणं अवघड आहे. पण, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भातले काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, डॉ. दाभोलकर यांच्या हत्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणा कधी पोहोचणार व मणिपूर महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ ‘निर्भया मॉर्निंग वॉक’ फेरी काढण्यात आली. या फेरीत फलटण शाखेचे समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच पाठ्यपुस्तक विभागाने पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिध्दांत वगळला, या निषेधार्थ फलटण शाखेच्या कार्यकर्त्यांनी पाठ्यपुस्तक विभागाला पोस्टकार्ड पाठवण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!