
दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या ५७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या मानव कल्याणार्थ प्रचार यात्रेदरम्यान बारामती शहरात आगमन होत आहे.
निरंकारी सद्गुरू माताजी बारामतीत येत असल्याने येथील श्रद्धाळू भतांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी या संत समागमाची माहिती देताना सांगितले की, मंगळवार, दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर संत समागम संपन्न होईल.