स्थैर्य, फलटण, दि. ०४ : दि. ०३ जुन २०२१ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील कुरेशी मोहल्ला, मंगळवार पेठ येथील इरफान याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांचे पाच साथीदार यांनी कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर पणे जिवंत जनावरे व १५०० किलो म्हणजेच दिड टन गोमांस व त्याची वाहतूक करण्यासाठी लागणारी वाहने असे एकुण नऊ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मिळालेली माहिती अशी की, १५०० किलो जनावराचे गोमांस, एक बिगर नंबर महिंद्रा पिकप, मारुती 800, एक मोटर सायकल असा एकुण नऊ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल याप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे व संबंधित संशयीत आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, सचिन राऊळ, सहा. फौजदार भोईटे, पोलीस हवालदार ठाकूर, पो. ना. चातुरे, पो. ना. सूळ, पो. ना. लावंड, पो. ना. भोसले, पो.ना. वाडकर, पो. कॉ. बडे, पो. कॉ. लोलपोड यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहे.