दैनिक स्थैर्य | दि. १६ मे २०२३ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) गावच्या सरपंच कांचन रमेश निंबाळकर (वय ४४) यांची स्कुटी बोबडे पेट्रोलपंपापुढे कच्च्या रस्त्यावर अडवून त्यांना दोन अनोळखी इसमांनी धमकी दिल्याची घटना दि. १४ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नितीन मदने (रा. निंभोरे, तालुका फलटण) व दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. १४ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास निंभोरे (ता. फलटण) गावच्या सरपंच कांचन रमेश निंबाळकर (वय ४४) यांची स्कुटी बोबडे पेट्रोलपंपापुढे कच्च्या रस्त्यावरून जात असताना नितीन विनायक मदने (रा. निंभोरे) यांच्या सांगण्यावरून दोन ओळखी इसम (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) हे मोटरसायकलवरून तेथे आले व सरपंच कांचन निंबाळकर यांच्या गाडीला आडवे मारून ‘तू मयूर खोमणे व स्नेहल धनंजय रणवरे यांचे वाटेला जायचे नाही, वाटेला गेले तर कसे असते ते बघितलं का’, अशी धमकी देऊन सरपंच यांच्या स्कुटीला लाथ मारून स्कुटीचे नुकसान केले, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो. हवा. काशिद करत आहेत.