प्रवासादरम्यान सापडलेले पाकीट रोख रक्कमेसह फलटण बस स्थानक प्रमुखांकडे सुपुर्द करताना निलेश इथापे
स्थैर्य, फलटण दि.८ : मुंबई – पंढरपूर एस.टी.बसने प्रवास करणार्या मुंबई येथील निलेश इथापे यांना प्रवासादरम्यान एस.टी.बसमध्ये पाकीट सापडले. ते पाकीट त्यांनी प्रामाणिकपणे फलटण स्थानकप्रमुखांकडे सुपुर्द केले. सदरच्या पाकीटामध्ये 4 हजार 600 रुपये रोख रक्कम होती. निलेश इथापे यांचे या प्रामाणिकपणाबद्दल सर्वांनी कौतुक केले.