फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी निखिल मोरे रुजु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 16 मार्च 2024 | फलटण | फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी निखिल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार सुद्धा स्वीकारला आहे. गत काही महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची बदली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे झाली होती. त्यानंतर खंडाळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्याकडे अतिरिक्त चार्ज देण्यात आला होता. जवळपास दोन महिन्यांनी फलटण नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले आहे.

निखिल मोरे यांनी यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिका येथे उपायुक्त, सासवड येथे मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले आहे. तर फलटण येथे नियुक्ती होण्यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज बघत होते.

निखिल मोरे हे मुळ सांगली शहरातील असून सन 2019 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजु झाले आहेत.


Back to top button
Don`t copy text!