निफ्टी ११,००० पार; सेन्सेक्सही तेजीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, २० : भारतीय बाजाराने आयटी आणि बँकिंग स्टॉक्सच्या आधारे आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक व्यापार केला. निफ्टीने १.११ % किंवा १२०.५० अंकांची वृद्धी घेत ११ हजारांचा पल्ला गाठला. निफ्टी ११,०२२ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.०८% किंवा ३९८.८५ अंकांनी वाढून ३७,४१८.९९ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, जवळपास १४८७ शेअर्सनी नफा कमावला. १८१ शेअर्स स्थिर होते तर ११५४ शेअर्सची घसरण झाली. ब्रिटानिया इंडस्ट्रीज (५.१२%), बजाज फायनान्स (४.०८%), एचसीएल टेक्नोलॉजी (४.२१%), बजाज फिनसर्व्ह (४.००%) आणि युपीएल (४.०७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्समध्ये होते. तर सन फार्मा (३.९०%), सिपला (२.१५%) आणि झी एंटरटेनमेंट (१.७२%), बीपीसीएल (१.६८%) आणि एनटीपीसी (१.२५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा व्यतिरिक्त सर्व सेक्टर्समधील निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपनी अनुक्रमे ०.९२% आणि १.०२% ची वृद्धी दर्शवली.

फेडरल बँक: फेडरल बँकेचे शेअर्स ३.१७% नी वाढले व त्यांनी ५३.७० रुपयांवर व्यापार केला. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी बँकेतील २२ लाख शेअर्स विकत घेऊन कंपनीतील गुंतवणूक वाढवल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

इन्फोसिस लिमिटेड: इन्फोसिस लिमिटेडने कंपनीच्या कामाच्या ठिकाणची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी लॅनक्सेसशी धोरणात्मक संबंध जोडले. परिणामी आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचे शेअर्स ४.४१% नी वाढले व त्यांनी ९४२.९५ रुपयांवर व्यापार केला.

देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये आज वित्तीय आणि एफएमसीजीतील दिग्गजांनी नफ्यात कमाई केली. त्यामुळे बाजारातील भावना सकारात्मक दिसून आल्या, परिणामी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने वृद्धी घेत ७४.९१ रुपये एवढे मूल्य कमावले.

आजच्या सत्रात सोन्यानी घसरण घेत १८०० डॉलर प्रति औसांवर विक्री केली. जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे सोन्याच्या किंमतीला आधार मिळाला.

जगभरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने कच्च्या तेलाची मागणी सुधारण्याविषयीची चिंता वाढली. परिणामी तेलाचे दर आजच्या व्यापारी सत्रात घसरले.

कोरोना विषाणूचे रुग्ण आणि लस येण्याविषयीची अनिश्चितता यामुळे आजच्या व्यापारी सत्रात जागतिक बाजाराने घसरणीचा व्यापार केला. युरोपियन मार्केटनेही घट दर्शवली. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१८% ने तर एफटीएसई१०० चे शेअर्स ०.७७% नी घसरले. हँगसेंगचे शेअर्स ०.१२% नी घसरले तर नॅसडॅक आणि निक्केई २२५ चे शेअर्स सकारात्मक दिसून आले व त्यांनी अनुक्रमे ०.२८% आणि ०.०९% चा व्यापार केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!