
दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । निरगुडी, ता. फलटण येथील ग्रामपंचायतीच्यावतीने नवीन जन्मलेल्या मुला-मुलींचे स्वागत फॉरेस्ट अधिकारी विलास शिंदे यांच्यावतीने 2 नारळाची रोपे देऊन करण्यात आले.
2023-24 मध्ये 35 बाळांना नारळाची रोपे वाटप करून स्वागत केले होते. 2024-25 ला 24 बाळांचे स्वागत करण्यात आले. आत्तापर्यंत सलग 5 वर्षे या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आत्तापर्यंत 400 रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी फॉरेस्ट अधिकारी विलास शिंदे, युवा नेते सचिन सस्ते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी नारायण कदम, आशा वर्कर्स, बाळांचे आई-वडील, आजी आजोबा, ग्रामस्थ उपस्थित होते.