अँटीलिया प्रकरणात नवीन खुलासा : स्कॉर्पियो गाडीमागे दिसलेली ‘ती’ इनोव्हा NIA कडून जप्त, क्राइम ब्रांचमध्ये असताना सचिन वाझेंकडून गाडीचा वापर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १४: मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)च्या पथकाच्या हाती मोठे यश आले आहे. एनआयएच्या पथकाने अँटीलियाबाहेर दिसलेल्या इनोव्हा गाडीला शनिवारी रात्री शोधले आहे. वृत्त संस्थेने तपास यंत्रणेच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, क्राइम ब्रांचमध्ये असताना सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी हीच कार वापरत होते.

सचिन वाझेंचा अजून एक व्हिडिओ व्हायरल

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका स्कॉर्पियो कारजवळ दिसत आहेत. ही कार हूबेहूब अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार सारखी आहे. महाराष्ट्र ATS आता या व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरचा आहे, जेव्हा वाझे हे पोलिस पथकासह पत्रकार अर्णब गोस्वामीला अटक करत होते. यावेळी, रिपब्लिक टीव्हीच्या टीमने त्यांचा पाठलाग केला, त्यानंतर त्यांनी ताफा थांबवला. त्यावेळी तीच संशयास्पद कार त्याच्या जवळ उभी असल्याचे दिसून येत आहे.

कार मालकाच्या मृत्यूच्या प्रकरणातही आरोप झाले
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’च्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन याच्या मृत्यूच्या प्रकरणातही त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास अँडी टेररिझम स्कॉड (ATS) करत आहे. या संपूर्ण प्रकरणात मनसुख यांच्या स्कॉर्पिओ चोरीचेही एक प्रकरण समोर आले असून महाराष्ट्र पोलिस तपास करत आहेत.

सचिन वाझेंवरील सर्व आरोपानंतर महाराष्ट्र गृहखात्याच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे शाखेतून काढून टाकण्यात आले. त्यांना नागरी सुविधा केंद्रात पाठवण्यात आले आहे. शुक्रवार 12 मार्च रोजी संध्याकाळी हा आदेश देण्यात आला. 10 मार्च रोजी विरोधकांनी महाराष्ट्र विधानसभेत या प्रकरणात गोंधळ घातला होता. यावर गृहराज्यमंत्री अनिल देशमुख हे वाझेंच्या बदलीबाबत बोलले.


Back to top button
Don`t copy text!