स्थैर्य, फलटण दि.६ : येथील शंकर मार्केट येथे असणार्या मुतारीची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. त्यानंतर ‘स्थैर्य’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर फलटण नगरपालिकेच्या वतीने शंकर मार्केट येथील मुतारी नव्याने बांधण्यात येत असून येथे पुरुषांबरोबर महिलांसाठी मुतारीची सोय करण्यात आलेली आहे.
फलटणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षापदी महिला विराजमान झाल्यावर पहिल्या बैठकीमध्ये फलटण शहरातील विविध चौकात महिलांसाठी मुतारीची सोय उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता जवळपास 4 वर्षानंतर का होईना फलटण शहरातील काही चौकात तरी पुरुषांसोबत महिलांसाठीसुद्धा मुतारी बांधण्यात येत आहे. निदान कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आत तरी लोकनियुक्त महिला नगराध्यक्षांना महिलांच्या महतवाचा प्रश्न सोडणवण्यात यश आले असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
दरम्यान, सध्या फलटण शहरामधील महत्वाच्या मुतार्या नगरपालिकेने जमीनदोस्त केल्याने अनेक नागरिकांना सध्या नव्याने कोठे मुतार्या बांधण्यात आलेल्या आहेत हे ठावूक नाही. त्यामुळे नागरिकांना ह्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.