भारतीय संविधानवादी साहित्य संमेलनाची आवश्यकता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२२ । सातारा । अलीकडच्या काळात माझ्या डोक्यात अनेक विचार यायला लागलेत त्यातला एक महत्वाचा विचार आहे भारतीय संविधानवादी साहित्यसंमेलन. आजवर ग्रामीण,दलित ,स्त्रीवादी, अशी कितीतरी संमेलने आपण घेतलेली आहेत.अनेक गावात ग्रामीण साहित्य संमेलने घेतली जात आहेत.अखिल भारतीय साहित्य संमेलन देखील दरवर्षी आपण घेतच असतो,प्रत्येकाला आयडेटीटी कार्ड  लागत असते. भारतीय समाज व्यवस्था ही विषमतावादी व्यवस्था आहे. गावागावात आपण जाती पातीवरून सवते सुभे तयार  केलेले आहेत. कधी कधी राजकारणी लोक ,धर्म पंथ ,प्रदेश यावर आधारित संमेलने भरवतात ,ही कधी वेगळ्या अस्मितेसाठी, नावासाठी आवश्यक वाटत असतीलही.या पुढच्या काळात संविधानिक मुल्ये यांचा पुरस्कार करण्यासाठी अशी संमेलने प्रत्येक गावी आयोजित करण्यात यावीत असे मला वाटते. ज्यातून लोकशाही सजग होईल. सामाजिक व आर्थिक विषमता यावर चर्चा होईल. अनेकांच्या वेदना देखील एकत्र येऊन उमजून घेता येतील. काय चांगले काय वाईट याची चर्चा होईल. अशी संमेलने बंधुता वाढीस उपयोगी व्हावीत .स्त्री -पुरुष समता,मनुष्यत्व प्रतिष्ठा ,भेदभाव चिकित्सा ,कुटुंब व्यवस्था ,श्रद्धा आणि अंधश्रद्धा, शोषण प्रवृत्ती समग्र शोध व उपाय,मुलांच्या कल्याणाचा विचार ,विज्ञान तंत्रज्ञान विषयक व्यवस्था ,देश परदेश संबंध, रोजगार व्यवस्था ,बेकारी विषयीचे मंथन, नीती चिकित्सा , तत्वज्ञान आणि सत्य ,सामाजिक न्याय धोरण वास्तव ,समाज सुधारक यांचा विवेकवादी वारसा,स्वातंत्र्य हक्क ,नागरिकांची कर्तव्ये, धर्मनिरपेक्षता,राष्ट्रवाद चिकित्सा,विषमतेचा शोध आणि उपाय ,लोकोपयोगी ग्रंथ व लोकअहितकारक ग्रंथ चर्चा ,कविता वाचन ,नियती वाद आणि विज्ञान, देशहितकारक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास ,मनाचा शोध ,देशोदेशीची संस्कृती, भाषा आणि जीवन, संविधानाचे आदर्श ,व्यसनाधीनता ,आरोग्य, करियरच्या विविध वाटा ,आधुनिक शेती ,राष्ट्रीय एकात्मता ,सार्वभौमत्व ,एकता, सामंजस्य विवेक ,भारतीय भाषा आणि संस्कृती, आंतरभाषा काव्यवाचन ,संमिश्र संस्कृती ,भारतीय कला विकास ,भारतीय चित्रपट विकास ,वैज्ञानिक दृष्टीकोन
, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण व अहिंसा ,राष्ट्र प्रगतीतील अडचणी व उपाय ,मर्यादित व्यक्तिगत स्वातंत्र्य .समान संधी , उद्योग जगत, प्रादेशिक तंटे आणि उपाय,अभिव्यक्ती स्वातंत्र्य ,देश आणि शांतता,मनुष्यत्वाची अप्रतिष्ठा करणाऱ्या प्रथा ,धार्मिक स्वातंत्र्य आणि मर्यादा, मुलभूत हक्क व मर्यादा, भारतीय नागरिकासाठी मार्गदर्शक तत्वे ,इत्यादी अनेक विषय या संमेलनात असायला हवे. भारतीय लोक हे संविधान विचारधारा घेऊन स्वतःला देशाची जबाबदार नागरिक होतील तर देशाची प्रगती खूप होईल. विविध प्रकारची विषमता ,भ्रष्टाचार ,धर्मांधता ,प्रादेशिक भांडणे,व्यक्ती पूजा स्तोम ,गरीब श्रीमंत वाद, बेरोजगारी, आर्थिक बाबीचा अभाव ,या गोष्टीनी एक प्रकारचे जळमटलेले वातावरण सर्वत्र झालेले आहे. सतत अस्वस्थ असणारा समाज देशात आहे. प्रश्न घेऊन हैराण झालेल्या पिढीला दिलासा देण्याची जबाबदारी कोणाची ? हा प्रश्न आज उभा राहिलेला आहे.

भारतीय लोकशाही उभी राहत असताना होणारी मतदान प्रक्रिया आणि मतदान करताना पैसा घेऊन कोणी मतदान करीत असेल तर त्या मताचे मूल्य त्या माणसाला कळले का हा प्रश्न उभा राहत आहे. धन असलेले लोक पैसे वाटून निवडणूक जिंकत, पुन्हा पुन्हा तीच तीच माणसे निवडून येत असतील आणि आणि अशा प्रकारचे पैसे घेऊन निवडून देणारे यांना पुन्हा त्याचे काहीच देणे घेणे नसेल तर ही व्यवस्था चांगली होईल तरी कशी ? हा प्रश्न आज तसाच उभा राहिलेला .नोकरदार इमानदारीने नोकरीत योगदान देणारे नसतील तर देहात चांगले बदल तरी कसे होतील हा प्रश्न आहे ,रोज एखाद्या धर्मावर अन्याय झाला म्हणून लोक उठून सांप्रदायिक हिंसा भडकावत असतील तर हे फार चांगले नाही. धडधडीत खोटे बोलून जर अंधश्रद्धा पेरल्या जात असतील आणि समाज ते ऐकून घेऊन आपला सारा वेळ त्यात घालवत असेल तर नागरिक विवेकी कसा होणार ? बेरोजगार असलेली मुले इकडे तिकडे कुठे दहा पाच हजाराची तरी नोकरी मिळते का असे म्हणून वणवण भटकत असतील तर शिक्षणाने काय साध्य झाले ? सर्वानीच चांगल्या गोष्टी करायच्या सोडून, चालायचे करा कसेतरी काम म्हणून ढकलस्टार्ट पद्धतीने कामे केली तर समोरची कामे होणार तर कशी ? असे कित्येक प्रश्न आज उभा राहिलेले आहेत. सगळेच बिघडलेत मग तुम्ही काय करणार ? जाऊ द्या गप्प बसा म्हणून सारे सहन करतात. त्या मुळे अलीकडे साहित्य देखील एक दाखवेगिरी होत आहे काय ? हा प्रश्न पडलेला आहे.व्यक्तीपुजेचे सुख साहित्यिकांना जास्त हवे असावे कि काय ? असाच प्रकार कधी कधी वाटायला लागतो ,आणि त्यामुळे संविधानवादी संमेलन मला आवश्यक वाटू लागले आहे .मी भारतीय आहे ,मला माझ्यासहित सर्व
भारतीयांना उदिष्ट दिशेने जागरूक करायचे आहे, त्यामुळे साहित्य संमेलनात आज ना उद्या हे ज्ञान व आचार संहितेचे विषय घ्यावे लागतील. देशात गतिरोध कुठे आणि कसा निर्माण झाला आहे यावर विचार करावा लागणार आहे.आज जरी काहींची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी आर्थिक व सामाजिक विषमतेचे प्रश्न कसे व्यवस्थित सोडवायचे हे पहावे लागणार आहे. सर्व भारतीय मुलांना समान संधी लवकर प्राप्त करून देण्याची जबाबदारी देशातील निवडून दिलेल्या सरकारला घ्यावी लागेल. धनदांडगे यांना सरकारी जमिनी आणि कंपन्या विकून देशातल्या लोकांना वाऱ्यावर सोडून देऊन चालणार नाही.डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजराप्रमाणे राहून फक्त स्वतःचा स्वार्थ साधने हे परवडणार नाही. धर्माच्या बागुलबुवात अज्ञानी भारतीय जनतेला अडकवून त्यांना देशाच्या सत्य परिस्थितीपासून बेदखल करणे परवडणार नाही. गाव गाव मुलांना केवळ संस्कृतीच्या गुट्या पाजायला दाईला लावून इथली कोवळी मुले व मुली धर्मधुंदीत ठेवून त्यांचे डोके भ्रमिष्ट करून चालणार नाही. भूतकाळातील विभूती पूजा ,पुतळे हे देश सुधारणार नाहीत.वर्तमान वास्तव माहीत करून देण्यासाठी गावोगावी अभ्यासू विचारवंत यांनी संविधान साहित्य संमेलने आयोजित करून भारताच्या भावी पिढीचे रक्षण करून त्यांना जबाबदार नागरिक तयार करण्यात योगदान द्यावे.गावकरी बांधवानी देखील प्रत्येक गावात निर्व्यसनी,सदाचारी,कष्टाळू,वैज्ञानिक दृष्टी असलेली, भारताच्या संविधांनाच्या आकांक्षा पूर्तीचे काम करायला हवे, ही मनात आलेली एक भावना आहे.योग्य वाटल्यास विचार व्हावा.


Back to top button
Don`t copy text!