दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । राज्यातील शाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात विविध ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मास्क देवून स्वागत करण्यात आले.
कोरोना रूग्णांची संख्या तुलनेने कमी होत असल्याने शासन स्तरावर सोमवार दि. 4/10/2021 पासून विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या कालावधीनंतर विद्यार्थी आता शाळा, महाविद्यालयामध्ये पुन्हा नव्याने आपल्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहेत. आपल्या शिक्षकांना, मित्र-मैत्रीणींना व पवित्र वास्तूंला भेटण्याचा त्यांचा हा पहिला दिवस, निश्चितच आनंदाचा असेल. त्यांच्या ह्या आनंदात आपणही सामील होऊ. या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका यांच्या वतीने फलटण तालुक्यातील वाठार (निं) येथे तालुकाध्यक्ष अभिजीत निंबाळकर, वडजल येथे तालुका उपाध्यक्ष निरंजन पिसाळ, आसू-पवारवाडी येथे तालुका सरचिटणीस प्रतिक पवार, निंबळक येथे तालुका संघटक स्वप्निल पिसाळ, फडतरवाडी येथे तालुका संघटक प्रसाद जाधव, हिंगणगाव येथे जिल्हा सरचिटणीस आदित्य भोईटे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मास्क देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.