राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण


स्थैर्य, मुंबई, दि.१८: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी ट्विट करुन दिली आहे. नुकतेच राज्यभर त्यांनी परिवार संवाद यात्रा केली होती. याला जोरदार प्रतिसाद देखील मिळाला होता. तसेच परवा राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.

जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे.

धन्यवाद 🙏

– Jayant Patil (@Jayant_R_Patil)

जयंत पाटील यांनी ट्विट करत माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितके कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल, सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!