स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज (बुधवार) पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादाळाचा तडाखा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, जावळी, पाटण तालुक्यांना बसू शकताे. त्यामुळे नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन केले होते. सातारा शहरात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास सुरु झालेला पाऊस साडे दहापर्यंत संततधार सुरुच हाेता. त्यामुळे शहरातील नऊ वाजता उघडणारी बाजारपेठ दहा वाजेपर्यंत उघडलीच नव्हती. पावसाचा जाेर काही केल्या कमी हाेईना त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे. तसेच या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सातारा येथे सर्व प्रमुख रस्ते पावसाने सुने सुने झाले होते. रस्त्यावर दररोज दिसणारी गर्दी अजिबात नव्हती.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील पावसाची रिमझिम सुरुच आहे. साेसाट्याच्या वारा सुटल्याने काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर पडून वाहतूकवर्दळ थांबली आहे. माण तालुक्यात कुकुडवाड परिसरात दाट पहाटेपासूनच धुक्यासह रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिक घरातच बसून आहेत. याबराेबर दुधेबावी परिसरात वारा व रिमझिम पाऊस सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार हवामान खात्याचा अंदाजा नुसार उद्या गुरुवारी ही अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 किलाे मीटर या वेगाने असू शकतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विशेषत महाबळेश्वर, जावली, वाई पाटण या तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, कच्चे घर असल्यास तात्काळ सूरक्षित ठिकाणी आवश्यक साहित्य व पशूधनासह स्थलांतरित व्हावे, विजेचे खांब तारा व झाडे यापासून दूर रहावे असे आवाहनही जिल्हा नियंत्रण कक्षाने केले आहे.
मुंबई
पुणे