
दैनिक स्थैर्य | दि. 17 जुन 2025 | फलटण | येथील लायन्स क्लबच्या माध्यमातून विना औषध विविध आजारांवर औषधोपचार करण्यासाठी “प्राकृतिक हेल्थ कॅम्प”चे आयोजन डॉ. राममनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था, राजस्थान यांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन जगदीश करवा यांनी दिली.
राजस्थान येथील डॉ. राममनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था व लायन्स क्लब फलटण यांच्या माध्यमातून मंगळवार दि. 17 जून ते शनिवार दि. 21 जून सकाळी ८ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्राकृतिक हेल्थ कॅम्पचे आयोजन माळजाई मंदिरामध्ये असणाऱ्या लायन्स हॉलमध्ये करण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना लायन जगदीश करवा म्हणाले की, गुडघेदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, मानदुखी, सायटिका, उंची वाढवणे, वजन कमी करणे, वजन वाढवणे, ब्लड प्रेशर, मधुमेह, ऍसिडिटी, गॅस, पॅरॅलिसिस, बवासीर, व्हेरिकोमेन्स, मानसिक त्रास यांसह अनेक रोगांचा उपचार विना औषध एक्सक्युप्रेशर, सुजोक, कपींग, व्हायब्रेशन थेरपीने या प्राकृतिक हेल्थकेंच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
प्राकृतिक हेल्थ कॅम्प मध्ये तज्ञ डॉक्टरांचा समावेश असून यामध्ये डॉ. डी के वैष्णव, डॉ. आकाश शर्मा, डॉ. विष्णू लांडगे यांचा समावेश आहे.
सदरील हेल्थ कॅम्पचे आयोजन लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून करण्यात आले असून अध्यक्ष लायन जगदीश करवा, सचिव लायन महेश साळुंखे, खजिनदार लायन रणजीत बर्गे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी सदरील हेल्थ केअर कॅम्पमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.
सदरील हेल्थ कॅम्पची नाव नोंदणी फी फक्त रुपये 200 असून ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत, त्यांनी गुडघ्याचा एक्स-रे काढलेला असेल तर सोबत घेऊन येण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे.