दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
बारामती शहरातील सायली हिल परिसरातील नागरिकांसाठी ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंवाद प्रभाग भेट कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत चर्चेत सहभाग घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन करत विकासकामांसाठी यापुढील काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याबाबत यावेळी ठराव करण्यात आला.
या कार्यक्रमास बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, इम्तियाज भाई शिकलकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर, उपाध्यक्ष प्रताप पागळे, शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, मा. नगरसेवक समीर चव्हाण, सिद्धनाथ भोकरे, महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल कावळे, तुषार लोखंडे, विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचा विकास करताना बारामती परिसराचा सुद्धा विकास होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अजित पवार यांनी घेतलेली भूमिका समर्थनीय असल्याचे शहर उपाध्यक्ष मंगेश ओमासे यांनी सांगितले.
सायली हिल परिसरातील विनोद शेळके, विजय कोठारी, सोहेल बागवान, निसार शेख, दत्ता देवकर, नलवडे सर व योगेश ओमासे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आभार मंगेश ओमासे यांनी मानले.